जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) माहिती आणि महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजीत पत्रकारांसाठी कार्यशाळेत तज्ज्ञांनी पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि प्रमाणभाषा लेखनाच्या शुद्धलेखनाचे मंत्र सांगितले. तीन वेगवेगळ्या सत्रात तज्ज्ञांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तीन विविध विषयावर पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आले. उद्घाटन सत्रानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर जिल्हा सुचना विज्ञान केंद्राचे माहिती केंद्र माहिती व अधिकारी विद्याधर शेळके, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांनी केले. विविध कृत्रिम बुद्धिमत्ता ॲपचा वापर, त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले. त्यासोबतच सायबर सुरक्षा, भाषांतर, ऑडीओ रुपांतरण, ऑडीओ ते मजकूर रुपांतरण, फाईल निर्मिती, अहवाल विश्लेषण, आकडेवारी विश्लेषण, ग्राफिक्स, छायाचित्र, निवड भाषेचा योग्य वापर यासंदर्भातील माहिती व सादरीकरण शरद दिवेकर यांनी केले.
जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी शासनामार्फत माहिती जनसंपर्क विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी, अधिस्वीकृती पत्रिका याबाबत पात्रता, निकष, आवश्यक कागदपत्रे याविषयीची माहिती दिली.
प्रा. दीपक रंगारी यांनी ‘मराठी भाषेचा पत्रकारितेमध्ये सुयोग्य वापर आ
णि प्रमाण लेखन’ याविषयी मार्गदर्शन केले. मराठी प्रमाणभाषेच्या शुद्धलेखनाचे नियम, शब्दाचा अर्थ, भाषेतील व्याकरणाचा वापर याबरोबरच मराठी भाषा समृद्ध करण्यात विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली.वाक्यामध्ये येणारी क्रियापदे, शब्दयोगी अव्यय, ऱ्हस्व, दीर्घ,ईकारांत याबरोबरच एकाक्षरी क्रियापद, शब्दयोगी अव्यय, तत्सम आणि तद्भव शब्दांविषयीचे स्पष्टीकरण उदाहरणासह समजावून सांगितले. पत्रकाराने शब्दकोश आणि लेखनकोश याचा वापर करून निर्दोष लिखाण कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले. विविध शब्दांच्या वाक्यानुसार आणि वेळेनुसार होणारा बदल उदाहरणासह सांगितला.
या कार्यशाळेसाठी आकाशवाणीचे वृत्तसंपादक समरजीत ठाकूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेतील जनसंपर्क विभागाचे संजय वाघ, सतीश औरंगाबादकर, आरोग्य विभागाच्या संवाद तज्ज्ञ विद्या सानप, पत्रकारांच्या संघटनांचे अध्यक्ष व सदस्य या कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.दैनिक पुण्यनगरी चे विजय बहादुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.