महापालिका निवडणूक 2025 : राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
महापालिका निवडणूक 2025 : राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूक 2025 चा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी 2869 जागांवर ही निवडणूक होणार आहे.
आचारसंहिता लागू
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आजपासून संबंधित सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्जाचा कार्यक्रम
-
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 : उमेदवारी अर्ज दाखल
-
31 डिसेंबर 2025 : अर्जांची छाननी
-
2 जानेवारी 2026 : अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
-
3 जानेवारी 2026 : निवडणूक चिन्हांचे वाटप
-
15 जानेवारी 2026 : मतदान
-
16 जानेवारी 2026 : मतमोजणी
आरक्षणाची माहिती
2869 जागांपैकी –
-
1442 जागा महिलांसाठी राखीव
-
341 जागा अनुसूचित जाती (SC) साठी राखीव
-
77 जागा अनुसूचित जमाती (ST) साठी राखीव
-
759 जागा इतर मागासवर्गीय (OBC) साठी राखीव
कोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक होणार?
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, मालेगाव, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाडा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर.

