मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना ह्या गोष्टीचा अडथळा

Jul 6, 2024 - 23:57
 0
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना ह्या गोष्टीचा अडथळा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता चर्चेत आहे.परंतु महिलांना त्रास होऊ नये यासाठी सरकारने नियमावलीत काही बदल केलेले आहे. यापूर्वी उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र तसेच नॅशनॅलिटी सर्टिफिकेट गरजेचे होते, परंतु महिलांना यासाठी तहसील कार्यालय व सेतू कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहावे लागत होते. ही गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने रहिवास प्रमाणपत्र तसेच ज्या लोकांकडे पिवळे व केशरी राशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसल्याची घोषणा केली.  आता महिलांसमोर एक नवीन अडथळा निर्माण झालेला आहे. उत्पन्नाचा प्रमाणपत्र गरजेचे नसल्यानंतर रेशन कार्ड धारक आता रेशन दुकानाच्या बाहेर रांगा करत आहे.

राशन कार्ड धारकांना राशन कार्ड अपडेट करणे, तसेच नवीन नाव जोडणे किंवा ज्या महिलांचे नाव राशन कार्ड मध्ये समाविष्ट नाही त्यासाठी सेतू सुविधा किंवा तहसील कार्यालयात जाने, तसेच रेशन दुकानदारा च्या रेकॉर्डमध्ये नाव समाविष्ट करणे इत्यादी गोष्टींसाठी आता महिलांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे अनेक रेशन दुकानात सध्या रांगा दिसत आहे