छत्रपती शाहू कॉलेज, लासूर स्टेशन येथे एड्स जनजागृती व रेड रिबन क्लब अंतर्गत विशेष व्याख्यान
औरंगाबाद : छत्रपती संभाजीनगर लासूर स्टेशन येथील छत्रपती शाहू कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने रेड रिबन क्लब व एड्स जनजागृती या निमित्ताने दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मा. सौ. फरीन सैयद मॅडम (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व काउन्सेलर) या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी एड्सविषयी असलेले गैरसमज व योग्य समज, सामाजिक जबाबदारी, रक्तदान हे सर्वोत्तम दान तसेच ताण-तणाव व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये एड्सबाबत योग्य माहिती पोहोचणे, समाजातील भेदभाव दूर करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे यावर त्यांनी विशेष भर दिला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव वाढीस लागल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

