सिद्धार्थनगर येथील मुस्लिम बहुल भागातील टिबु सुलतान यांचा पुतळा उभारणीसाठी मागणी
छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद| प्रतिनिधी :
सिद्धार्थनगर, हडको येथील मुस्लिम समाजाकडून प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिमत्व हजरत टिबु सुलतान यांचा पुतळा उभारण्याची मागणी वेगाने पुढे येत आहे. या संदर्भात अॅड. आर. बी. हिवराळे यांनी महानगरपालिका आयुक्तांना लेखी अर्ज देत पुतळा उभारणीची औपचारिक मागणी नोंदवली आहे.
अर्जात नमूद केल्यानुसार, सिद्धार्थनगर परिसरात सुमारे ४ हजारांहून अधिक मुस्लिम नागरिक वास्तव्यास आहेत. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून पुतळा उभारणीची मागणी प्रलंबित असल्याचा मुद्दा अर्जदारांनी मांडला आहे. स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ही मागणी तातडीने मान्य करावी, असेही अर्जात म्हटले आहे.
अर्जदारांनी असेही नमूद केले की, परिसरातील मैदान / रिक्त जागा उपलब्ध असून तेथे हजरत टिबु सुलतान पुतळा उभारल्यास स्थानिकांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भावनांना योग्य न्याय मिळेल.

