जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जुने झाड पडले!
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जुने झाड पडले!
औरंगाबाद (CSN) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मध्ये व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयासमोर दिल्लीगेट येथे जुने असलेले झाड सुमारे साडेसहा वाजता पडले.
या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेले नसून काही वेळपर्यंत परिसरातील वाहनांची मात्र कोंडी झाली.
महापालिकाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सूचना मिळताच त्यांनी त्या परिसरात धाव घेतली व त्यांचे पुढे चे काम सुरू केले.
(औरंगाबाद) छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती आणि त्याच कारणामुळे झाडाची ही अवस्था झाली असल्याचे कयास लागत आहे.