हरसुल येथील AIMIM नगरसेवक निवडून आल्यानंतर कामाला गती!
औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर: नुकतेच महानगरपालिका निवडणूक संपली असून हर्सूल येथे AIMIM चे सर्व पॅनल निवडून आले होते. हरसुल येथील जहांगीर कॉलनीच्या बाजूला इलियास कॉलनी येथे चेंबर चोकअप झाल्यानंतर महानगरपालिकाचे पथक स्थळावर पोहोचले आहे.
अनेक वर्षापासून पहिल्यांदाच येथे महानगरपालिकाचे कर्मचारी पोहोचलेले असून आता चेंबर सफाई चे काम सुरू झालेले आहे. हरसुल येथे नगरसेवक निवडून आल्यानंतर आता जलद गतीने काम सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे.

