मराठवाड्यातील पहिल्या मुस्लिम महिला RCI क्लिनिकल सायकॉलॉजिस्टचा बागबान समाजाकडून गौरव
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : बागबान एज्युकेशनल ट्रस्ट आणि बागबान पंच मुशावरती कमिटी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात मराठवाड्यातील पहिल्या मुस्लिम महिला RCI (Rehabilitation Council of India) मान्यताप्राप्त क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट सय्यदा फरहीन Adv. साजेद बागबान(Govt Of India Notry, Hight Court and District and Session Court Aurangabad यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सय्यदा फरहीन यांनी उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद येथून PGDRP (Post Graduate Diploma in Rehabilitation Psychology) ही पदव्युत्तर पदविका 2026 मध्ये 'A' ग्रेडसह 82 टक्के गुण मिळवत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे त्या मराठवाड्यातील पहिल्या मुस्लिम महिला RCI मान्यताप्राप्त क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट ठरल्या आहेत.
कार्यक्रमात त्यांच्या शैक्षणिक यशाचा आणि समाजासाठी प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी समाजातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, पालक, विद्यार्थी तसेच बागबान समाजातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात बिहार लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक आयुक्तपदी निवड झालेल्या अशरीन अशफाक बागबान यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच करिअर मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बागबान समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम समाजात प्रेरणादायी ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

