फुलंब्रीत भेसळीच्या दुधाचा मोठा पर्दाफाश! ३,५०० लिटर संशयित दूध जप्त; दोन डेअरींना टाळे

Jul 10, 2026 - 12:10
 0
फुलंब्रीत भेसळीच्या दुधाचा मोठा पर्दाफाश! ३,५०० लिटर संशयित दूध जप्त; दोन डेअरींना टाळे

Chh.Sambhajiangar (Aurangabad) : मा.अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या "Safe Food, Safe Maharashtra" मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई सुरूच आहे. फुलंब्री येथे सिद्धेश्वर दूध डेअरीवर टाकलेल्या धाडीत तब्बल ३ हजार ५०० लिटर संशयित दूध आणि दूध भेसळीसाठी वापरली जाणारी गोवर्धन दूध पावडर जप्त करण्यात आली. सुमारे १ लाख ३२ हजार रुपयांचे हे संशयित दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. तपासात हे दूध शिवकृपा डेअरीमार्फत पुढे विविध डेअरींना पुरवले जात असल्याचे समोर आल्यानंतर दोन्ही डेअरींना सील करण्यात आले आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एफडीए आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे

Loksawal News Loksawal Large Marathi news Network in Maharashtra.