एफ एम के उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज फुलंब्रीचा निकाल दरवर्षीप्रमाणे १०० टक्के

May 14, 2026 - 10:54
 0
एफ एम के उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज फुलंब्रीचा निकाल दरवर्षीप्रमाणे १०० टक्के

(लोकसवाल न्यूज फुलंब्री )

मुजीब मुल्तानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या फकीर मोहम्मद खान उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, फुलंब्रीचा दहावी व बारावीचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही १०० टक्के लागला आहे.

एफ एम के उर्दू ज्युनियर कॉलेज फुलंब्रीमध्ये प्रथम क्रमांक महक शेख अमीर हिने ६९.१७ टक्के, द्वितीय क्रमांक कुरेशी अल्फिया मुजीब हिने ६६.६७ टक्के तर तृतीय क्रमांक फैजा मुस्तफा पटेल हिने ६६.५० टक्के गुण मिळवून प्राप्त केला.

त्याचप्रमाणे हायस्कूल विभागात प्रथम क्रमांक काझी सदफ फातिमा मुन्तजीबुद्दीन हिने ८५.६० टक्के, द्वितीय क्रमांक कुरेशी बुशरा समद हिने ८४.२० टक्के तर तृतीय क्रमांक अर्शिया इस्माईल शाह आणि इंशा सय्यद नसीम यांनी ७८.२८ टक्के गुण मिळवून विशेष यश संपादन केले.

सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उल्लेखनीय यशाबद्दल सोसायटीचे अध्यक्ष खान मुजीब मुल्तानी, उर्दू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शेख अयुब सर, समीना अयुब, शशबाना मुजीब मुल्तानी, सीमा गौस, जमीर सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थी-विद्यार्थिनींना सोसायटीचे प्रशासकीय निरीक्षक खान अब्दुल सत्तार सर यांच्यासह हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुरैया बानो, शिक्षिका खान तबस्सुम बेगम, खान कौसर बेगम, फरजाना बेगम, नसरीन बेगम, रोमाना सालेहा, सदफ अंजुम, माजिद खान सर, उमर मुख्तार सर, शेख अदनान सर, इरफान सर, अब्दुल रज्जाक सर, सिद्दीकी अनवर सर, कादरी नदिम अहमद, अतहर मोहम्मदी आणि नफीस परवीन यांनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network in Maharashtra.