छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात हॉटेल रेस्टोरंटवर FDA ची धडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर -अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, अन्न व औषध प्रशासन राज्य यांनी सुरु केलेल्या "Safe Food, Safe Maharashtra" या मोहीमे अंतर्गत २३ जुन २०२६ रोजी निगर्मित केलेल्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये हॉटेल, रेस्टोरंट व इतर अन्न आस्थापनावर धडक मोहीम सुरु करण्यात आलेली आहे.होटेल आईच्या गावात, ईटखेडा, येथील फेमस व्हेज रेस्टोरंट कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे तपासणी करण्यात आली.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2026 नुसार महत्वाच्या नियमांचे उल्लंघन आढळून आले. अन्न औषध प्रशासनाने रेस्टोरंट चा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबीत करण्यात आलेला आहे.
तपासणीवेळी किचन मध्ये अन्न पदार्थ तयार करण्थाच्या ठिकाणी बुरशी लागलेले आंबे, ईतर पदार्थ वापरासाठी ठेवलेले आढळले. भाज्या तयार करण्यासाठी वापरत येणारी ग्रेव्ही न झाकता उघड्यावर ठेवलेली आढळली. तपासणीवेळी सदर पेठीच्या मेनुकार्डमध्ये बटर तंदूर रोटी, बटर नान् विक्रीसाठी असल्याचे नमुद आहे. बटर बाबत विचारणा केली असता त्यांनी Nutralite Professional fat Spread बापरत असल्याचे हजर व्यकी यांनी सांगीतले, सदरचे Vegetable Fat Spread वापरुनू बटर तंदूर रोटी, बटर नान तयार करून लोकांची फसवणूक केल्याचे आढळले.होटेल मध्ये अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पालेभाज्या या शिळ्या व बुरशी असल्याचे निदर्शनास आले.या ठिकाणी Storage करण्यासाठी Food Grade Material वापरले नाहीत. Plastic drum use केलेले आढळले. तसेच raw material अन्न पदार्थ आणि कचरा पेटी एकाच ठिकाणी साठवणुक केल्याचे आढळून आले. सदर पेठीमध्ये "सुरक्षित पिण्याचे पाणी विनामुल्य उपलब्ध आहे "असा फलक प्रदर्शित केलेला नाही.
किचनमध्ये मीठाचे पुडे, मसाला पैकेट प्लॅस्टीकच्या ट्रे मध्ये ठेवलेले आढळून आले. सदर ट्रे-मध्ये कलर loose मध्ये ठेवलेले आढळले. कलर हा prepared food मध्ये वापर करत असल्याचे आढळले.
हि कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे, अन्न व औषध प्रशासन म. राज्य यांच्या निर्देश तसेच मार्गदर्शनाखाली श्रीमती. व. ता. रोडे, अन्न सुरक्षा अधिकारी, श्रीमती. कि. ल. झाडे, अन्न सुरक्षा अधिकारी व श्री. द. वि. पाटील सहायक आयुक्त, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ-१ यांनी केली आहे.

