Jalna Crime : गरम तळपत्या सळईनी कातडी सोलल्या.; जालन्यातील धक्प्रकादायक प्रकार

Mar 6, 2025 - 12:44
 0
Jalna Crime : गरम तळपत्या सळईनी कातडी सोलल्या.; जालन्यातील  धक्प्रकादायक प्रकार

 राज्यामध्ये अत्याचाराच्या रोज नवीन घटना समोर येत आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.  जालनामधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जालनामधील असल्याचा दावा केला जातो आहे.

यामध्ये एका तरुणावरुन काही लोकांकडून अमानूष अत्याचार होत असल्याचे दिसत आहे. कैलास बोराडे असे या तरुणाचे नाव असल्याचे समोर येत आहे. तळपत्या सळईचे चटके हे पीडित तरुणाला दिले जात आहे. तरुणाच्या उघड्या अंगावर हे जळत्या सळईचे चटके दिले जात आहेत. तापलेल्या रॉडने कैलासच्या पायाला, पोटाला, पाठीला, मानेवर,गळ्याजवळ, दंडावर, डाव्या तळहातावरचटके देत संशयितांनी जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. जालन्याचे पोलिस प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून आरोपीला अटक झाली आहे.

तसेच आरोपीवर 307 चा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनांमुळे माणसांमधील माणूसकी हरवली असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या या गंभीर घटनांमुळे राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. हा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.


Loksawal News Loksawal Large Marathi news Network