मुख्याध्यापिका मंदाकिनी लहाने यांचा सापत्नीक सन्मानपर्वक निरोप

Sep 1, 2026 - 10:42
 0
मुख्याध्यापिका मंदाकिनी लहाने यांचा सापत्नीक सन्मानपर्वक निरोप

लोकसवाल फुलंब्री( प्रतिनिधी शाहरुख शेख)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुना साखर कारखाना फुलंब्री येथील मुख्याध्यापिका मंदाकिनी लहाने या आज दि 31/08/2026 रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांना सापत्नीक निरोप देण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी शालेय कमिटी व पालकांनी देखील श्रीमती लहाने यांचा सापत्नीक सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शिक्षक सुनिल महाजन यांनी मानले.याप्रसंगी शालेय अध्यक्ष श्रीमती नसरीन जावेद पठाण, ज्योती गंगावणे शाळेचे शिक्षक अनिता शिंदे, सुनिल महाजन, गीता जाधव, सीमा अंदुरे, अनिता इंगळे, सोनाजी लहाने छाया उमक, जमाल शेख, भारती तुपे, पूजा ढोके, सुनिता गाडेकर, मुन्ना शेख, बिलाल शेख, मुकीम शेख, सद्दाम शेख,एकनाथ गाडेकर, सुनीता सरोदे पालक व गावकरी हजर होते

Loksawal News Loksawal Large Marathi news Network in Maharashtra.