फुलंब्री येथे ट्रॅफिक जाम! तीन ते चार तास वाहतूक कोंडी
छत्रपती संभाजीनगर: (प्रतिनिधी शाहरुख शेख) औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यामध्ये ट्रॅफिक जाम झाल्यानंतर वाहनांची लांब रांगा पाहायला मिळाले. फुलंब्री च्या मेन रस्त्यावर हा सदर ट्रॅफिक जाम लागल्याचं समोर आलं आहे. काही वाहनांमुळे हे ट्रॅफिक जाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि तापमान खूप वाढलेले असून अशा ट्रॅफिक ज्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहे. किमान दोन ते तीन तास सदरील गाड्यांची लांबच लांब रांगा पाहायला मिळाले.
या ट्रॅफिक ज्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झालेले आहे. या ट्रॅफिकच्या त्रासाला नागरिकांनी सामोरे जावे नाही म्हणून प्रशासनाने काहीतरी तोडगा काढावा याकडे सर्व रहिवाशांचे लक्ष आहे.
या मार्गावर अनेकदा ट्रॅफिक जाम झालेले असून नागरिकांचे यामुळे हाल होत आहे.

