-->
समृद्धी महामार्गावर केमिकल ट्रकचा भीषण अपघात, सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर केमिकल ट्रकचा भीषण अपघात, सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची   घटना घडली. केमिकलने भरलेला एक ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रकमध्ये प्रचंड केमिकल्स होते. त्यामुळे खाली कोसळताच ट्रकने पेट घेतला. ही घटना एवढी भीषण होती की, ट्रकमधील प्रवाशांना प्राण वाचवण्याची संधी मिळाली नाही. ट्रकमधील सर्वच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या भयंकर घटनेतील मृतांचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र ड्रायव्हरसह सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला. हे अद्याप समोर  आलेलं नाही. मात्र ट्रकचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रकमधून केमिकलची वाहतूक केली जात होती. पुलाव खाली कोसळल्याने ट्रकमधील केमिकल्सने पेट घेतला. महामार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला बोलावलं. बचाव पथकाने आग विझवली. मात्र ट्रकमधील प्रवाशांना वाचवण्यात अपयश आलं.           
 नव्याने सुरु झालेल्या समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरु झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळीच स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला. ही गाडी पलटल्याने एकाचा मृत्यू झाला. तर अपघातात इतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला. नागपूर ते मुंबईच्या दिशेने जात असताना राजेवाडी परिसरात स्कॉर्पिओ उलटल्याने ही घटना घडली. यात अमरसिंग सवकीलाल सिंग या व्यक्तीचा मृत्यू झाला. तो उत्तर प्रदेशातील रहिवासी होता. तर गाडीतील वीरेंद्र सिंग आणि राजे सिंग हे दोघं गंभीर जखमी झाले.

0 Response to "समृद्धी महामार्गावर केमिकल ट्रकचा भीषण अपघात, सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe