विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 21 मे रोजी बैठक
विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 21 मे रोजी बैठक

औरंगाबाद (CSN) : विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 21 मे रोजी दुपारी 02.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर तथा अध्यक्ष, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव तथा उपायुक्त (महसूल) यांनी कळविले आहे.
विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारी तसेच गाऱ्हाणी समितीकडून ऐकून घेण्यात येत असून लेखी स्वरूपातील तक्रारी स्विकारण्यात येतात. विशिष्ट अभिकथनाबाबत स्वतंत्र्यपणे स्थानिक चौकशी करण्याच्या दृष्टीने तजवीज करण्यात आली आहे.
भ्रष्टाचार कोणत्या क्षेत्रात तसेच ठिकाणी होत आहे याबाबत माहिती घेत त्या क्षेत्रातील किंवा त्या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी उपाययोजना केल्या जातात. तसेच प्रशासकीय कार्यपध्दती, नियम व इतर शासकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचारास वाव राहू नये व त्यांचे निर्मुलन व्हावे यादृष्टीने सुलभता व पारदर्शकता आणण्याबाबत शिफारस करण्यात येते. सामान्य जनतेच्या प्रशासकीय कार्यपध्दतीबद्दल साशंकता वाटणार नाही व जनतेची कामे सहजगत्या कशी होतील याबाबत समिती मार्फत सबंधितांना सूचनाही बैठकीत देण्यात येतात.