-->
 औरंगाबाद नगरभुमापन अधिकारी आणि पत्रिका डाटा एंट्री ऑपरेटर ची मिलीभगत !  लाखोंचा घोळ, RPID चा आरोप

औरंगाबाद नगरभुमापन अधिकारी आणि पत्रिका डाटा एंट्री ऑपरेटर ची मिलीभगत ! लाखोंचा घोळ, RPID चा आरोप

औरंगाबाद प्रतिनिधि : रिपव्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोकॅटीक पक्षाकडून विनंती करण्यात आले आहे,  नगर भुमापन अधिकारी कार्यालय औरंगावाद यांच्या कार्यालयातील तत्कालीन नगर भुमापन अधिकारी गणेश सोनार परिक्षण भुमापक क्र.2 श्री.आरेफ यासिन शेख आणि परिक्षण भुमापन क्र 6 अनिल रुपेकर, स्विय सहाय्यक सुजात आखिप पत्रिका डाटा एंट्री ऑपरेटर या सर्वांनी मिळून नगर भुमापन क्र.20489/1/1 चे मालक सय्यद मोहम्मद सज्जात हुसैन हे आहेत यांची फेरफार क्र.43 प्रमाणे दिनांक 20/11/1986 रोजी नोंद नगर भुमापन अधिकारी औरंगाबाद यांच्या पत्रानुसार दिसून येते. त्याच बरोबर सय्यद जैनुन अबोद्दिन पि सय्यद मोहम्मद सज्जाद यांचा फेर फार क्र.7084 प्रमाणे दिनांक 24/01/2013 नुसार नोंद आहे.

नगर भुमापन अधिकारी कार्यालयाने दिनंांक 21/01/2013 रोजी नगर भुमापन क्र.  नोंद घेतांना चुकीच्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेली आहे. नगर भुमापन क्र. 20489/1/1 मधील नंबर 1 चे मालक मोहम्मद सज्जात हुसैन हे असुन यांचा दिनांक 03/01/2010 रोजी मृत्यु झालेला आहे. त्यांच्या मृत्यु नंतर नगर भुमापन

क्र. 20489/1/1 ची नोंद ही दिनांक 24 /01/2013 ची आहे. म्हणजेच नगर भुमापन क्र.20489/1/1 मधील मालक मोहम्मद सज्जात हुसैन हे दिनांक 03/01/2010 रोजी मयत झालेले असल्यामुळे नोंदणीकृत नोंदणी पर्सनल हिबानामा क्षेत्र 721.50 चौ.मी.देणार सय्यद जैनुन पि.अकसर नवाब जंग कडून नोटरी हिबानामा दिनांक 13/12/2012 रोजी तयार झालेला आहे.त्याआधारे सैय्यद जैनुन अबोदिन पि.सय्यद मोहम्मद सज्जाद हूसैन ही नोंद दिनांक 24/01/2013 रोजी करण्यात आलेली आहे. सय्यद मोहम्मद सज्जाद हुसैन हे मयत असल्यामुळे ते नोंटरी हिबानामा दि. 13/12/2012 ला कसा तयार तयार करुन देऊ शकतात. सय्यद मोहम्मद सज्जाद हुसैन यांचा दिनांक 03/01/2010 रोजी मृत्यु झालेला आहे त्यांच्या मृत्युच्या दोन वर्षानंतर म्हणजेच दि. 13/12/2012 ला हिबानामा तयार झालेला आहे. मग हा प्रश्न येतो की मरणपावलेला व्यक्ती त्याच्यामृत्युच्या दोन वर्षानंतर हिबानामा तयार करणे ही बाब कायदेशीर दृष्टया अशक्य असुन अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. नगर भुमापन क्र.20489/1/1 मधील सैय्यद जैनुन अबोद्दिन पि.सय्यद मोहम्मद सज्जाद हूसैन यांनी दिनांक 13/12/2012 रोजी नगर भुमापन अधिकारी औरंगाबाद यांच्याकडे सादर केलेला हिबानामा हा बनावट स्वरुपाचा असल्यामुळे बनावट हिबानाम्या आधारे सदरची नोंद झालेली आहे. हि बाब स्पष्ट होणारी आहे. नगर भुमान क्र. 20489/1/1 ची नोंद बनावट हिबानाम्याने घेतलेली आहे. या नोंद घेणारे आरीफ यासीन शेख व रुपेकर,परिक्षण भुमापक क्र.2 (समर्थ नगर) तत्कालीन नगर भुमापक अधिकारी श्री.गणेश सोनार व त्यांचे स्विय सहाय्यक सुजात आखिव पत्रिका डाटा एंट्री ऑपरेटर यांनी गेतलेल्या असून या नोंदी घेण्याचा कालावधी प्रत्यक्षरित्या वेगळा असुन नगर भुमापन क्रमांकाच्या नोंदीचा कालावधी हा वेगळा आहे. परंतु नोंद घेणारे खात्रीलायक रित्या वरील अधिकारी व कर्मचारी आहेत. संदर्भ क्र.5 नुसार नगर भुमापन अधिकारी औरंगाबाद शालिनी बिदरकर यांच्या म्हणण्याप्रमाणे मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमि अभिलेख (म.रा.) पुणे यांचे निर्देशानुसार या कार्यालयाकडून दि.01/04/2021 पासून मिळकत आखिव पत्रिकेच्या नक्कल व फेरफाराच्या कारवाईचे कामकाज ई.पी. सी. आय.एस. ऑनलाईन प्रणालीमध्ये सुरु झालेली आहे. तक्रार अर्जदार यांनी निवेदनात नमुद केलेली मिळकत पत्रिका कार्यालयीन मुळ अभिलेखात दिसून येत नसल्याने या कार्यालयाने दि.27/10/2021 रोजीच्या पत्राने सदर मिळकत पत्रिकेच्या व्यवहाराबाबत स्थगीती देण्याबाबतचा प्रस्ताव आपल्या कार्यालयास सादर केलेला आहे असे कळविलेले आहे. शिवाय त्यांनी नगर भुमापन क्र. 20489/1/1 च्या मुळ कागदपत्रांचा शोध घेतला असता ते कार्यालयात आढळून आलेले नाही. हे त्यांनी मान्य केलेले असून त्या संबंधीचे मिळकत प्रमाणपत्र कोणत्या आधारे तयार केले ही बाब त्यांनी नमुद केलेली नाही. सदर मिळकतीचे प्रमाणपत्र तयार करणारे कार्यालय त्यांचेच आहे. त्यांच्याच कार्यालयाकडून मिळकत प्रमाणपत्र तयार केले जातात. त्याच बरोबर मुळ अभिलेखात नोंद नाही तर त्यांनी मिळकतीची ऑनलाईन नोंद कोणत्या आधारे केली. ऑनलाईन नोंद घेणारे कार्यालय नगर भुमापन अधिकारी औरंगाबाद यांचेच आहे ऑनलाईन नोंद घेत असतांना नगर भुमापन अधिकारी यांच्या सहमती शिवाय नोंद होणे शक्य नाही ऑनलाईन प्रक्रिया व मिळकतीचा फेरफार करणारे कार्यालय नगर भुमापन अधिकारी यांचेच आहे त्यामुळे नगर भुमापन अधिकारी औरंगाबाद यांनी संदर्भ क्र.5 च्या पत्रामध्ये उल्लेख केल्या प्रमाणे तक्रारीत नमुद केलेले कर्मचारी नगर भुमापन अधिकारी कार्यालय येथे सन 2012-13 मध्ये कार्यरत नव्हते असे त्यांनी म्हणलेले आहे त्यामुळे त्यांचे विरोधात कार्यवाही करण्याचा प्रश्न उदभवत नाही मग असा प्रश्न उपस्थित होतो की, नगर भुमापन क्र.20489/1/1 ची नोंद कार्यालयात कशीकाय आली श्री.अनिल रुपेकर यांची ऑनलाईन डिजीटल स्वाक्षरी असल्याचे त्यांनी मान्य केलेले आहे. त्यामुळेच ऑनलाईन डॉक्युमेंट तयार झाले म्हणजेच कार्यालयातील कर्मचार्यांचे आहे ही बाब नगर भुमापन अधिकारी औरंगाबाद कशी काय काम आपल्याच नाकारु शकता? हा प्रकार नगर भुमापन अधिकारी यांनी दूर्लक्षीत केलेला आहे. शिवाय डिजीटल स्वाक्षरी वापरणारे कार्यालय त्यांचेच आहे, मिळकतीच्या ऑनलाईन नोंदी घेण्याचे काम त्यांच्याच कार्यालयाचे आहे. मिळकती ऑनलाईन करण्याचे काम त्यांच्याच कार्यालयाचे आहे. ही सर्व कामे त्यांच्याच कार्यालयात होतात. नंतर त्यांच्याच कर्मचार्यांनी सांगायचे की हे काम आम्ही केलेच नाही, आम्हाला माहितीच नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तक्रारदाराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.

नगरभुमापन क्र.20489/1/1 ची नोंद घेतांना अनियमितता करणारे अधिकारी व कर्मचारी दोषी असून त्यांच्यावर कायदेशीर चौकशी होऊन कार्यवाही होने गरजेचे असून त्यांनी केलेली अनियमितता नाकारणे हे चुकीचे होईल, त्यांच्या अनियमिततेला नियमितता दाखविण्याचा कायदेशीर प्रयत्न शालिनी विदरकर नगर भुमापन अधिकारी औरंगावाद ह्या करत असुन त्यामुळे त्यांची ही या प्रकरणात सखोल चौकशी करुन कार्यवाही करावी व नियमितता करणार्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईसाठी कार्यवाही सुरु करावी. त्याच बरोबर आपल्या कार्यालयाच्या समोर सुरु असलेले आमरण उपोषणाची आपण कुठल्याही प्रकारची दखल न घेता आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर भ्रष्ट अधिकाऱ्यांची बाजू घेऊन उपोषणकत्त्यांची बदनामी करण्याचा आपणाकडून केवीलवाना प्रयत्न झालेला आहे.त्यामुळे

आपण प्रामाणिकपणे या प्रकरणात स्वतः लक्ष घालून कार्यवाही सुरु करावी अन्यथा मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांच्याकडे उपोषण सुरु ठेवून दाद मागण्यात येईल. यावर कार्यवाही न झाल्यास दिनांक 03/12/2021 रोजी  पक्षाच्या वतीने संतप्त निदर्शने करण्यात येतील याची नोंद घ्यावी असे निवेदनही सादर केले आहे.


0 Response to " औरंगाबाद नगरभुमापन अधिकारी आणि पत्रिका डाटा एंट्री ऑपरेटर ची मिलीभगत ! लाखोंचा घोळ, RPID चा आरोप "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe