शिवभक्तांना अतिरेकी संबोधल्याने खासदार शाहू महाराजांच्या विरोधात पुण्यात हिंदू संघटना आक्रमक
यावेळी 'आई भवानी शक्ती दे विशाल गडाला मुक्ती दे' अशा घोषणा देण्यात आल्या.

विशाळगड किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर खासदार शाहू महाराज यांनी शिवभक्तांना अतिरेकी म्हणून संबोधलं याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुण्यात हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात आलेआले. यावेळी 'आई भवानी शक्ती दे विशाल गडाला मुक्ती दे' अशा घोषणा देण्यात आल्या. पुण्यातील टेक्निकल गुडलक चौकात मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव यावेळी एकवटले होते. शंख वाजवत या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. शिरीष महाराज मोरे, आंदोलक