दुय्यम निबंधक कार्यालय 2  पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात येणार ? पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी पुन्हा भेट.

Sep 27, 2026 - 18:21
 0
दुय्यम निबंधक कार्यालय 2  पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात येणार ? पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी पुन्हा भेट.

छत्रपती संभाजी नगर येथील दुय्यम निबंधक कार्यालय 2 हे चिकलठाणा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु तेथे सोई सुविधा उपलब्ध नसल्याचे अनेक तक्रारी दाखल झाल्या. सदरील जिल्हाधिकारी परिसरात सोयी सुविधा उपलब्ध असून कार्यालयासाठी जागा सुद्धा उपलब्ध आहे. तसेच या परिसरात तहसील कार्यालय बँक व इतर शासकीय खाते असल्यामुळे अनेक नागरिकांना दस्त नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रे काढण्यासाठी सवलत होते. परंतु काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी परिसरातील एकूण तीन दुय्यम निबंधक कार्यालय मधील दोन कार्यालय या परिसरातून स्थलांतरित करण्यात आले आहे. महत्त्वाचे असे की जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जागा ही शासकीय असून स्थलांतरित करण्यात आलेले कार्यालय हे खाजगी इमारतीत आहे. त्यामुळे शासनाला यासाठी भाडे सुद्धा भरावे लागत आहे. म्हणून दुय्यम निबंध कार्यालयाच्या परिसरातील दस्त लेखक व इतर काम करणाऱ्या लोकांनी माननीय पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी पुन्हा भेट देऊन दुय्यम निबंधक कार्यालय पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात यावे यासाठी निवेदन दिलेले आहे.

पालकमंत्र्यांची काय प्रतिक्रिया: पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सर्व बाबी ऐकल्यानंतर आश्वासन दिले आहे की यावर ते सखोल माहिती घेऊन निर्णय घेणार आहे. दुय्यम निबंध कार्यालय स्थलांतराची माहिती किंबहुना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा नव्हती. या सर्व विषयांना वर जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी दिलेले आहे.

बाळासाहेब थोरात यांची पालकमंत्र्यांशी चर्चा : सदr विषयावर शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांनीही पालकमंत्र्यांशी चर्चा केलेली असून सदरील कार्यालय लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात यावे अशी विनंती पालकमंत्री यांना केलेले आहे.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network in Maharashtra.