शिक्षकदिनानिमित्त मुख्याध्यापक मुलतानी मुजीब खान मुनीर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार

फुलंब्री(प्रतिनिधी)-५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त राजीव गांधी सोसायटीच्या वतीने यावर्षीचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार फकीर मोहम्मद खान उर्दू प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेज फुलंब्रीचे मुख्याध्यापक मुलतानी मुजीब खान मुनीर खान यांना देण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष मोहसीन अहेमद यांनी हा पुरस्कार त्यांना मोहसीन अहेमद शाळा रोशन गेट औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक व पालक उपस्थित होते