शांतीनिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची फुलंब्री पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट
लोकसवाल न्यूज फुलंब्री
दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी शांतीनिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फुलंब्री पोलीस स्टेशनला शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. या क्षेत्रभेटीअंतर्गत फुलंब्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सहाणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना *कायदा व सुव्यवस्था, पोलीस प्रशासनाचे कामकाज, विविध शस्त्रे, विविध कायदे व कलमे याबाबत सविस्तर माहिती दिली.*यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने विविध प्रश्न विचारले. त्यांना *पोलीस निरीक्षक श्री. सहाणे, पोलीस उपनिरीक्षक श्री. चाटे साहेब तसेच उपस्थित पोलीस कर्मचारी यांनी समर्पक व सविस्तर उत्तरे देत मार्गदर्शन केले.*ही शैक्षणिक क्षेत्रभेट *मुख्याध्यापिका श्रीमती मंजुश्री खंडागळे व पर्यवेक्षक श्री. ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रीमती माधुरी खांडखुळे, श्री. रामेश्वर भादवे, श्रीमती प्रतीक्षा वैद्य, श्री. सतीश बोरसे सर व श्री. प्रफुल मरकटे यांची उपस्थिती होती.*या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने त्यांचा कायदा व सामाजिक जबाबदारीविषयीचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला.

