फुलंब्री येथील शांतिनिकेतन विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

(लोकसवाल न्यूज फुलंब्री)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांनी मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालामध्ये फुलंब्री येथील शातिनिकेतन विद्यालय व ज्यु कॉलेज शाळेतील सर्व इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली, शाळेचा निकाल खालील प्रमाणे १) अभिषेक भिकन वाघ ८८.८०% २) हर्षवर्धन दिलीप शेरकर ८८.००% ३) साई ज्ञानेश्वर तावडे ८७.००% त्याचबरोबर शाळेतील १४ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त गुण मिळविले. तसेच ७०% ते ८०% गुण मिळविणारे १२ विद्यार्थी आहेत. उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणीतील गुण मिळाले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शालेय व्यवस्थापन, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन वर्षभर मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन फुलंब्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौ. अनुराधाताई चव्हाण, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (पुणे) श्री. अतुल (काका) चव्हाण, संस्थेचे सचिव श्री. कल्याण दादा चव्हाण, प्रशासकीय अधिकारी श्री. मनोज चव्हाण तसेच प्राचार्य श्री. सचिन कोल्हे व उपप्राचार्या श्रीमती मंजुश्री खंडागळे, पर्यवेक्षक श्री. ज्ञानेश्वर जाधव, श्री. सतिष बोरसे यांनी केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.