फुलंब्री येथील एफ एम के उर्दू हायस्कूल दहावीचा निकाल 97%टक्के

May 14, 2025 - 22:29
 0
फुलंब्री येथील एफ एम के उर्दू हायस्कूल दहावीचा निकाल 97%टक्के

(लोकसवाल न्यूज़ फुलंब्री)

मुजीब मुलतानी एज्युकेशन सोसायटी संचालित फुलब्री येथील फकीर मुहम्मद खान उर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७% लागला. एफ एम के उर्दू हायस्कूलमध्ये शेख नदीम खालिकने ८१.२०% गुणांसह पहिला क्रमांक, पठाण अदिबा फिरोजने ७८% गुणांसह दुसरा क्रमांक, काझी आशना फिरदौस मोइनुद्दीनने ७३.३०% गुणांसह तिसरा क्रमांक, सिद्दीकी जुनिया फातिमा समिनुद्दीनने ७२.८०% गुणांसह चौथा क्रमांक, सय्यद मिसबाह अन्वर ने ७२.२०% गुणांसह पाचवा क्रमांक आणि आयेशा वसीम खान ने ७०% गुणांसह सहावा क्रमांक पटकावला.त्याचप्रमाणे अलीशा अन्वर पटेल, अल्ताफ शेख नईम, काझी रोजिना झहीर, नबिला सगीर कुरेशी, सानिया अनीस, सोफिया रशीद पटेल, चिश्ती जैद शमसुद्दीन, शोएब इजाज शाह, जुनैद कासिम, सईद असद यांना विशेष गुण मिळाले.सोसायटीचे अध्यक्ष खान मुजीब मुल्तानी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांसोबत सोसायटीचे प्रशासकीय पर्यवेक्षक खान अब्दुल सत्तार सर, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुरैया बानो, दहावीचे इंचार्ज उमर मुख्तार सर, अब्दुल कुद्दूस सर, माजिद खान सर, इरफान सर, अब्दुल रज्जाक सर, सिद्दीकी अन्वर सर, कादरी नदीम अहमद उपस्थित होते.खान तबस्सुम बेगम, खान कौसर बेगम, फरजाना बेगम, नसरीन बेगम, सदफ अंजुम, नफीस परवीन यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network