एड.आर.बि. हिवराळे यांच्या कठीण परिश्रमाने 18 वर्षीय ओमकार राजू सूर्यवंशी याच्या गंभीर आरोप भा.द.वि कलम 307 या आरोपातून जामीन मंजू

Jul 2, 2024 - 16:13
 0
एड.आर.बि. हिवराळे यांच्या कठीण परिश्रमाने 18 वर्षीय ओमकार राजू सूर्यवंशी याच्या गंभीर आरोप भा.द.वि कलम 307 या आरोपातून जामीन मंजू

नितीन दाभाडे -

दिनांक ०५/०२/२००२४ रोजी फिर्यादी नामे अजिंक्य सुनील रासे वय १६ वर्ष रा. राज नगर मुकुंदवाडी यांना आरोपी नामे ओमकार राजू सूर्यवंशी वय १८ वर्ष रा. राज नगर मुकुंदवाडी याने धारदार शस्त्राने अजिंक्यला मारहाण केली या अंतर्गत भा.द.वि कलम ३०७,३२४,३२३,५०६ अशा प्रकारचे गुन्हे मुकुंदवाडी पोलीस स्टेशन येथे दिनांक ०६/०२/२०२४ रोजी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात एड. आर.बि. हिवराळे यांनी मा. न्यायालयासमोर आपली बाजू मांडली व मा. न्यायालयाला हि बाजू खरी वाटली म्हणून मा. न्यायधीश श्री. एस. एम. कुचे यांनी आरोपी ओमकार राजू सूर्यवंशी याची जामीन दिनांक १४/०३/२०२४ रोजी मंजूर केला.