-->
महानगरपालिकेने शहरवासियांवर नव्याने लादलेली अन्यायकारक जुलमी मालमत्ता करवाढ तात्काळ रद्द करा-आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

महानगरपालिकेने शहरवासियांवर नव्याने लादलेली अन्यायकारक जुलमी मालमत्ता करवाढ तात्काळ रद्द करा-आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
औरंगाबाद : आज दि.१४/२/२४ बुधवार रोजी सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने तसेच समस्त छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)शहर वासियांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना विभागीय आयुक्तांमार्फत जाहीर निवेदन देन्यात आले की, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने चालु आर्थिक वर्षापासून भाड्यावर आधारित कर आकारणी (रेंटल व्हॅल्यू बेसइ) करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार एप्रिल २०२४ पासून नव्या मालमत्तांना कर लावताना वाढीव दर लावले जाणार आहेत. महानगरपालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी नवीन घरगुती मालमत्तांसाठी ६५ टक्के व व्यवसायिक मालमत्तांसाठी १२८ टक्के करवाढ हा शहर वासियांवर अन्याय करणारा निर्णय घेतला आहे. 

कारण छत्रपती औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या अनेक वसाहतीतील नागरिक चांगले रस्ते, स्ट्रीटलाईट, ड्रेनेज लाईन, स्वच्छता, मुबलक पिण्याचे पाणी, निरोगी आरोग्य अशा अनेक प्रकारच्या महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या मूलभूत सुविधांपासून अद्यापपर्यंत बंचित आहेत. तसेच महापालिकेने गुंठेवारी मालमत्ता नियमित करण्यासाठी अनेक गुंठेवारी वसाहतीत राहणा-या नागरिकांकडून प्रचंड प्रमाणात शास्तीकर भरून घेतला; परंतु तेथील वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना अद्यापर्यंतही कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत, यामुळे शहर वासियांमध्ये मनपा प्रशासनाबद्दल प्रचंड रोष दिसून येत आहे. याच कारणांमुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मागील २०१२ पासून नवीन दराने कर लावलेला नव्हता व तसेच मुंबई महानगरपालिकेनेही या वर्षीच्या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारची करवाढ केलेली नाही.

त्याच धर्तीवर आपणास विनंती की, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील शहर वासियांवर लादलेली अन्यायकारक करवाढ रद्द करण्यात यावी. नसता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांना सोबत घेऊन प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल व विषयी न्यायालयीन दाद मागण्यात येईल, प्रशासनाला असा ईशाराही यावेळी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दिपक निकाळजे यांनी दिला आहे, यावेळी आंबेडकरी चळवळीचे दिनकर ओंकार, राजु साबळे,आनंद कस्तुरे,दिपक खिल्लारे, विशाल इंगळे,राहुल साळवे, विजय वाहुळ, मुकेश खोतकर, अमित वाहुळ,सचिन जोगदंड, विजय शिनगारे, नितीन आदमाने, विजय शिनगारे,सचिन भुईगळ,नरेश वरठे, अक्षय जाधव, सुनिल सोनवणे, संतोष चव्हाण,आशिष मनोरे, सिध्दार्थ जाधव, भाऊसाहेब गवळी, प्रथम कांबळे, अमोल शेजवळ, राहुल जाधव,दिपक गवळी व मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटनांचे नेते कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते..

0 Response to "महानगरपालिकेने शहरवासियांवर नव्याने लादलेली अन्यायकारक जुलमी मालमत्ता करवाढ तात्काळ रद्द करा-आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe