-->
चेतना शिक्षण प्रसारित मंडळाचे कला वरिष्ठ महाविद्यालय सावंगी (हर्सूल) औरंगाबाद येथे व्यसनमुक्ती व्याख्यानाचे आयोजन

चेतना शिक्षण प्रसारित मंडळाचे कला वरिष्ठ महाविद्यालय सावंगी (हर्सूल) औरंगाबाद येथे व्यसनमुक्ती व्याख्यानाचे आयोजन

 

औरंगाबाद : चेतना शिक्षण प्रसारित मंडळाचे कला वरिष्ठ महाविद्यालय सावंगी (हर्सूल) औरंगाबाद येथे समाजशास्त्र विभाग व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व्याख्यान व जनजागृती कार्यक्रम दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी पार पाडण्यात आला.

या प्रसंगी महाविद्यालयात कार्यक्रमाच्या व्याख्याता मा.डॉ. अस्मिता निंबाळकर मॅडम, कार्यक्रमाच्या  अध्यक्षा डॉ.उषा बनसोडे मॅडम, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अंजली भुसारे मॅडम, आयोजक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिलीप मिसळ सर, समाजशास्त्र विभागातील डॉ. राणी जोगदंड मॅडम, संपूर्ण प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची व्यसनमुक्ती विषयी जनजागृती करण्यात आली. व्यसनामुळे होणारे परिणाम व नुकसान या व्याख्यानातून मा.डॉ.अस्मिता निंबाळकर मॅडम यांनी स्पष्ट केले. भविष्यात या व्याख्यानाचा विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होईल असे मत त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले.

0 Response to "चेतना शिक्षण प्रसारित मंडळाचे कला वरिष्ठ महाविद्यालय सावंगी (हर्सूल) औरंगाबाद येथे व्यसनमुक्ती व्याख्यानाचे आयोजन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe