
औरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती
शुक्रवार, २३ जुलै, २०२१
Comment
औरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राहणाऱ्या आरोपी भुऱ्या सोबत त्याची मैत्री होती. 21 जुलै रोजी दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. त्यानंतर आरोपी भुऱ्याने गुरुवारी मंगेशच्या घरी जाऊन मंगेश व त्याच्या वडिलांची माफी मागितली. दोघेही पुन्हा आधीसारखेच मैत्रीपूर्ण बोलायला लागले होते. पण, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मंगेश गल्लीच्या चौकातील ओट्यावर बसलेला असताना भुऱ्या त्याच्या आईसह तेथे आला. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला.
मंगेश यावेळी खूप रागात होता. रागाच्या भरात तो भुऱ्याशी वाइट शब्दांत बोलत होता. आपल्याच आईसमोर मंगेश असे सुनावत असल्याने भूऱ्याच्या पारा चढला व त्याला खुप राग आला. त्याने कोणताही विचार न करता स्वतः जवळील असलेले धारदार चाकू काढला व मंगेशला त्याच ठिकाणी भोसकले.
मंगेश रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडला. हे पाहून भुऱ्याने तेथून पळ काढला. मंगेश रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे पाहून स्थानिकांनी त्याला रिक्षातुन औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्री मंगेशने आखरी श्वास घेतला. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी भुऱ्याला अटक केली.
0 Response to "औरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती "
टिप्पणी पोस्ट करा