-->
पुण्यातील खंडोजीबाबा चौकात निखिल वागळेंचं वाहन अडवून निखिल वागळेंवर हल्ला !

पुण्यातील खंडोजीबाबा चौकात निखिल वागळेंचं वाहन अडवून निखिल वागळेंवर हल्ला !



शुक्रवारी (9 फेब्रुवारी) ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर पुण्यात दगडफेक करत हल्ला करण्यात आला.यावेळी कारमध्ये वागळेंसोबत अॅड. असीम सरोदे आणि डॉ. विश्वंभर चौधरीही होते.हल्ल्यादरम्यान कारवर शाईफेक आणि अंडीफेकही करण्यात आली.भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा 'निर्भय बनो'च्या समर्थकांचं म्हणणं आहे.निखिल वागळे पुण्यात 'निर्भय बनो'च्या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून उपस्थित राहण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला.

पुण्यातील खंडोजीबाबा चौकात निखिल वागळेंचं वाहन अडवून, भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात वागळे बसलेल्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत.या हल्ल्यानंतरही निखिल वागळे 'निर्भय बनो'च्या कार्यक्रमात पोहोचले.'लढा लोकशाहीचा, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा' असं म्हणत डॉ. विश्वंभर चौधरी आणि अॅड. असीम सरोदे हे महाराष्ट्रभर 'निर्भय बनो'च्या सभा घेत आहेत. याच सभेसाठी पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आले होते.पुण्यातील साने गुरूजी स्मारकातील निळू फुले सभागृहात ही सभा पार पडली

0 Response to "पुण्यातील खंडोजीबाबा चौकात निखिल वागळेंचं वाहन अडवून निखिल वागळेंवर हल्ला ! "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe