-->
अखेर....गोळीबारात जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू

अखेर....गोळीबारात जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू

महेंद्र मोरेयांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला महेंद्र मोरे यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ते उपचारांना साथ देत नव्हते. म्हणून त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं.

तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली.7 फेब्रुवारीला महेंद्र मोरे हे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात महेंद्र मोरे हे गंभीरित्या जखमी झाले होते. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार झाला होता. या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या नव्या एसपींनी चाळीसगावला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. महेंद्र मोरे यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया अजून समजू शकलेली नाही. दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. फेसबुक लाइव्ह दरम्यान मॉरिस नावाच्या आरोपीने त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता.

0 Response to "अखेर....गोळीबारात जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe