-->
हर्सुल टी पॉइंट वर बसनार तथागत बुद्धांचा पुतळा मा.बच्चुभाऊ कडु करणार मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा- आंबेडकरी चळवळीच्या आंदोलना यश मिळणार

हर्सुल टी पॉइंट वर बसनार तथागत बुद्धांचा पुतळा मा.बच्चुभाऊ कडु करणार मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा- आंबेडकरी चळवळीच्या आंदोलना यश मिळणार



अजिंठा बौद्ध लेणीला जाणाऱ्या हर्सुल टी-पॉईंट मुख्य चौकात तथागत गौतम बुद्धांचा भव्य पुतळा बसवावा आणि या पुतळ्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी चळवळीच्या शिष्टमंडळाला जाणीवपूर्वक जातिवाचक व अपमानास्पद वागणूक देणाऱ्या मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांचेवर तात्काळ निलंबित करून कायदेशीर कारवाई करावी नसता समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सरकार विरोधात आंदोलन छेडणार अशी मागणी करित आज आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने आज आमदार मा.बच्चुभाऊ कडु (अध्यक्ष-दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय महाराष्ट्र राज्य,) यांची आज मा.विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेउन याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

याविषयी त्यांनी सकारात्मक चर्चा करुन हा समाज अस्मितेचा विषय मार्गी लावण्यासाठी मी स्वतः याविषयामध्ये लक्षघालुन मा.मुख्यमंत्री साहेबांकडे याविषयी चर्चा करुण हा विषय लवकरात लवकर मार्गी लावेल असा विश्वास भाऊंनी आज समस्त आंबेडकरी चळवळीच्या शिष्टमंडळाला दिला आहे, यावेळी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दिपक निकाळजे,आनंद कस्तुरे, सचिन जोगदंड, संतोष चव्हाण, स्वप्नील सिरसाट,हरीष पाटील,राम पाखरे,रोहन जाधव, राहुल जाधव व ईतर भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "हर्सुल टी पॉइंट वर बसनार तथागत बुद्धांचा पुतळा मा.बच्चुभाऊ कडु करणार मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा- आंबेडकरी चळवळीच्या आंदोलना यश मिळणार"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe