-->
मुकनायक वृत्तपत्राचा १०४ वा वर्धापन दिवस सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनाच्या वतीने उत्सहात साजरा.

मुकनायक वृत्तपत्राचा १०४ वा वर्धापन दिवस सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनाच्या वतीने उत्सहात साजरा.

 

लोकसवाल : शोषित,दलित,पीडित कष्टकरी समाजाच्या वेदना आणि विद्रोह प्रकट करण्यासाठी विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक वृत्तपत्र मुकनायक आज ३१ जानेवारी १९२० रोजी प्रसिद्ध केले होते, आज रोजी या ऐतिहासिक पाक्षिक वृत्तपत्राला १०४ वर्षे पुर्ण झाली असुन आज भड़कल गेट येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पन करुण समस्त आंबेडकरवादी पक्ष संघटनाच्या वतीने अभिवादन करुण हा ऐतिहासिक वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने बाबासाहेबांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदान सर्व सामान्याच्या न्याय हक्कासाठी त्यानी उभारलेला लढा, सर्वसामान्य दलित शोषित पीड़ित समाजाला मुकनायक, बहिक्रूत भारत, जनता, समता, प्रबुद्ध भारत या ईतिहासिक परिवर्तनवादी वृत्तपत्र प्रसिद्ध करुण पीडीतांना न्याय मिळवुन दिला असे अनेक प्रसंग यावेळी उपस्थित वक्त्यांनी सांगितले, दरवर्शी प्रमाणे महापुरुषांच्या नावे गगनभेदी घोषणा देत बाबासाहेबांना अभिवादन करुण वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी दिपक निकाळजे, सय्यद तौफिक,अरुण सिरसाट,अमित वाहुळ,राहुल साळवे,विजय वाहुळ, डॉ.विलास जोंधळे,डॉ.बडगे सर,सचिन जोगदंड,रतनकुमार साळवे,डॉ.किशोर साळवे,स्वप्निल शिरसाठ,संतोष चव्हाण,सोनु पाईकडे,दिपक गवळी,राम पाखरे, रोहन जाधव,शिलवंत गोपनारायन,नागेश केदारे, त्रिशरण गायकवाड,नितीन निकाळजे,सिध्दार्थ सूर्यवंशी, हरीश पाटील,आकाश ओंकार,यावेळी सर्व पक्षीय‌ आंबेडकरवादी पक्ष संघटनांचे नेते ,पदाधिकारी व सर्व भिमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 Response to "मुकनायक वृत्तपत्राचा १०४ वा वर्धापन दिवस सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनाच्या वतीने उत्सहात साजरा."

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe