-->
फुलंब्रीत वारंवार वाहतूकाची कोंडी

फुलंब्रीत वारंवार वाहतूकाची कोंडी




फुलंब्री शहरातील टी पॉइंट परिसर ते फुलंब्री बस स्थानक या अंतरावर वारंवार वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रविवारी सकाळ पासून वाहतूक ठप्प होती रस्त्यावर उभी असणारी वाहने व रस्त्यावर थाटलेल्या व्यावयिकांमुळे पुन्हा येथे वाहतूक कोडी झाली. यामुळे मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी त्रास सहन करावा लागला. रविवारी सकाळी पोलिसांच्या मदतीने सदरील वाहतूक दोन-अडीच तासानंतर पूर्ववत झाली. याचा फटका रुग्णवाहिकांनाही बसला. औरंगाबाद ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग फुलंब्री शहरातून जात असल्याने या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून रोडचे काम सुरू आहे नेहमीच वाहनाच्या वर्दळीमुळे चार चाकी व दुचाकी वाहने रोडवर उभी असते वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार रोज घडत असते तसेच औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय थाटल्यामुळे मुख्य महामार्गावर मोठी गर्दी होत आहे.रविवारी रस्त्यावर उभी असणारी वाहने व रस्त्यावर थाटलेल्या व्यावयिकांमुळे पुन्हा वाहतूक कोंडी झाली यामुळे मार्गावरुन प्रवासकरणान्या वाहनधारकांनी त्रास मोठा मनस्ताप सहन करावा लागला

0 Response to "फुलंब्रीत वारंवार वाहतूकाची कोंडी"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe