
डुलकी जीवावर बेतली, ट्रकची उसाच्या ट्रॉलीला जोरदार धडक, चालकाचा जागीच मृत्यू
शुक्रवार, १० मार्च, २०२३
Comment
परभणी-सिमेंटचे पोते घेऊन जाणाऱ्या ट्रकने उसाच्या ट्रॉलीला जोराची धडक दिली. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रॅक्टरचा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना परभणीच्या मानवत तालुक्यातील राणी टाकळी जवळील हमदापुर पाटील जवळ घडली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. जखमी ट्रॅक्टर चालकावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.चंद्रपूर येथून बीडकडे सिमेंटचे पोते घेऊन टी. एस 01 युसी 5556 हा ट्रक जात होता. ट्रक पोखरणी ते पाथरी रोडवरील रामेटाकळी जवळील हमदापूर पाठी जवळ आला असता ट्रकने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उसाच्या ट्रॉलीला जोराची धडक दिली.या अपघातामध्ये ट्रक चालक बासीद सिराजोद्दीन (रा. हरियाणा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक बंडू उर्फ नवनाथ जाधव (रा. कोक्कर कॉलनी ता. मानवत) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी ट्रॅक्टर चालकावर मानवत येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.अपघाताची माहिती मिळताच मानवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश स्वामी, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, प्रभाकर कापुरे, पोलिस कर्मचारी भरत नलावडे, मधुकर चट्टे, शेख जावेद, विष्णु चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. ट्रक चालकाला पहाटेच्या सुमारास अचानक डुलकी लागल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
0 Response to "डुलकी जीवावर बेतली, ट्रकची उसाच्या ट्रॉलीला जोरदार धडक, चालकाचा जागीच मृत्यू"
टिप्पणी पोस्ट करा