
समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर ट्रकचे दोन तुकडे, एक ठार
शुक्रवार, १० मार्च, २०२३
Comment
अमरावती : पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.अमरावतीजवळ झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.धामणगाव तालुक्यात शेंदुरजनाजवळ भरधाव ट्रक पुलावरुन थेट खाली कोसळला. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकचे दोन तुकडेच झाले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे.जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
0 Response to "समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर ट्रकचे दोन तुकडे, एक ठार"
टिप्पणी पोस्ट करा