-->
फुलंब्री,येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा

फुलंब्री,येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा


  Loksawal न्यूज फुलंब्री,येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला 


दिंनाक १० मार्च २०२३ रोजी मा.आमदार डॉ.कल्याण काळे  यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या वतिने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला 

पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. पिकविमा देण्यास कंपन्याकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत. शासनाने विविध मदतीच्या घोषणा केल्या परंतु त्याचा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत लाभ मिळालेला नाही. शेतकरी कसातरी तग धरून उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे तर, त्यामध्ये शेतकऱ्यांना रात्री अपरात्री विद्युत पुरवठा दिला जात आहे आणि वीजबील भरण्याची त्याची सध्याची परिस्थिती नसतांना विद्युत पुरवठा बंद करण्यांत येत आहे. रासायनिक खताचे भाव गगनाला भिडले असून, यांत्रिकी शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांचे इंधन (पेट्रोल / डिझेल) यांचे देखील भाव अति वाढलेले आहे. एकीकडे उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळत नाही आणि महागाईने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे शेतकरी एकवटाला असून, खालील मागण्या मान्य करून आर्थिक मदत मिळावी म्हणून तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला आहे.


१)मोठे काबडकष्ट करून पिकवलेल्या कापसाला प्रति क्विंटल रू. १५०००/- तर कांद्याला प्रतिक्विंटल रू. ४०००/- भाव देण्यांत यावा.


२) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असतांना देखील पिकविमा देण्यांत विलंब झाला असून तो तातडीने देण्यात यावा.


३) अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने अनुदान घोषित केले होते. परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नसून, ते तातडीने देण्यांत यावे.४) नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रू. ५० हजाराचे अनुदान घोषित केले होते. परंतु शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नसून, ते तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे.


(५) शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असतांना शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद करून, हातातोंडाशी आलेला घास हिसकावण्यात आला आहे. करिता विद्युत पुरवठा बंद करण्यांत येऊ नये व दिवसा विद्युत पुरवठा देण्यांत यावा.


६) एकाबाजुला शेतकऱ्यांचा मालाला भाव नाही आणि रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल यांचे भाव गगनाला भिडल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. तरी पेट्रोल / डिझेल व रासायनिक खताचे भाव कमी करण्यांत यावे.


७) घरगुती गॅस सिलेंडरचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्याचे बजट कोलमडत आहे. तरी घरगुती गॅस सिलेंडरचे भाव त्वरीत कमी करण्यांत यावे. 


८) शेतकऱ्यांसाठी उभारलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना, फुलंब्री शासनाने चालु करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व कर्मचारी / कामगारांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे. 

९) महिलांच्या सबलीकरणासाठी महिला बचत गटाच्या महिलांना व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.


अशा अनेक मागण्यासाठी आज फुलंब्री विधानसभा कॅांग्रेस कमिटीच्या वतिने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्या वेळी मा.मंत्री श्री.अनिल पटेलजी,मा.आ.नामदेव पवारजी,महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष श्री.विलास बापु औताडे,किरण पाटील डोणगावकर व जिल्ह्यातील व मतदारसंघातील पदधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.



0 Response to "फुलंब्री,येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe