
ह्या अर्थसंकल्पावर मी समाधानी नाही - राजू शेट्टी
बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३
Comment
KOLHAPUR- बजेटवर मी तरी समाधानी नाही.सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवले. रासायनिक खाताच्या वाढत्या किंमती नियंत्रणात कस आणणार या प्रश्नाचे उत्तर बजेट मध्ये नाही. डेअरी आणि पोल्ट्री साठी तोकडी तरतूद.या देशातील केवळ 4% लोकांनाच हमीभाव मिळतो.शेतीसाठी सरकार करतंय काय? ४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात तुमचं समाधान नाही झाल का ? भरड धान्य शेतकऱ्याला परवडत का? ऊसाचा एफआरपी प्रमाणे हमीभाव कायदेशीर करा. ऊस वजन करणारे काटे डिजिटल करण्याची मागणी होतं नाही. तर मग प्रत्यक्ष डिजिटलायझेशन होणार का? कापूस उत्पादकसाठी नवनवीन बियाणे आणि संशोधन कारण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे. शेतकऱ्यांनी उत्पडीत केलेला माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नाही. किमान हमीभाव कायदा करावा तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील.
0 Response to "ह्या अर्थसंकल्पावर मी समाधानी नाही - राजू शेट्टी"
टिप्पणी पोस्ट करा