.jpeg)
फुलंब्रीत ११ परीक्षा केंद्रांवर ४ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
लोकसवाल न्यूज फुलंब्री : यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, फुलंब्री तालुक्यात १० परीक्षा केंद्रांवर ४ हजार ८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.तालुक्यात बारावीसाठी १० परीक्षा केंद्र होती. यात यंदा आणखी एका परीक्षा केंद्राची वाढ झाली आहे. तालुक्यात असलेल्या परीक्षा केंद्रात फुलंब्री जि. प. शाळा, पदमावती कनिष्ठ विद्यालय, शेलगाव यशवंत कनिष्ठ विद्यालय, बोरगाव अर्ज, न्यू हायस्कूल, किनगाव, संत सावता गुरुकुल विद्यालय, फुलंब्री, राजर्षी शाहू विद्यालय, पाथी, गोरक्ष विद्यालय, खामगाव, प्रभात कनिष्ठ विद्यालय, निधोना, बाबासाहेब आकात कनिष्ठ विद्यालय, टाळकी कोलते, सरस्वती कनिष्ठ विद्यालय, बडोद बाजार, माध्यमिक विद्यालय, तळेगाव केंद्रांचा समावेश आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता संवेदनशिल परीक्षा केंद्रांवर वर्ग एक व वर्ग दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बैठे पथक कार्यरत राहणार आहे. इतर परीक्षा केंद्रांवरही चार जणांचे बैठे पथक राहणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी दिली.
0 Response to "फुलंब्रीत ११ परीक्षा केंद्रांवर ४ हजार विद्यार्थी देणार परीक्षा"
टिप्पणी पोस्ट करा