
कामगार आयुक्त कार्यालयांवर माथाडी कामगारांची निदर्शने
AURANGABAD - माथाडी कायद्याची कठोर अमलबजावणी आणि या कायद्याची सरकारी पातळीवरून होणारी बदनामी तात्काळ थांबवावी म्हणून आज कामगार आयुक्त कार्यालयावर , माथाडी कामगारांनी प्रचंड निदर्शने केली. माथाडी कामगारांची अनेक कायदेशीर प्रकरण वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. माथाडी मंडळांचे निष्क्रियतेमुळे, अनेक कायदेशीर हक्कापासून माथाडीना वंचित राहवे लागते परिणामी अनेकांना आपल्या रोजगारांना मुकावे लागले आहे. नोंदित माथाडी कामगारांना कायद्यांचे संरक्षण व लाभ, थकबाकी वसुली, वेतन निश्चिती, कामाच्या ठिकाणचया अत्यावश्यक सुविधा, वेतन फरकाची वसूली, इ. प्रश्ना बरोबरच, माथाडी कायद्याची जाणिवपूर्वक बदनामी केली जात असून ती तात्काळ थांबवली गेली पाहिजे अशी मागणी केली आहे. राज्यातील अशा प्रश्नावर नुकतीच, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे प्रतिनिधींची बैठक होवून, पुढील १५ दिवसात राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांवर मोर्चे काढून निदर्शने करण्यात आली.
0 Response to "कामगार आयुक्त कार्यालयांवर माथाडी कामगारांची निदर्शने"
टिप्पणी पोस्ट करा