
मुंबईतील संगीत कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की;
मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३
Comment
सोमवारी चेंबूर येथे झालेल्या एका संगीत कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेत सोनू निगमला किरकोळ दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याने चेंबूर पोलिसांत गुन्हाही दाखल केला आहे.सोमवारी चेंबूर येथे एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सोनू निगमही उपस्थित होता. कार्यक्रम झाल्यानंतर सोनू निगम व त्याचे काही सहकारी व्यासपीठावरुन खाली उतरत असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेत सोनू निगम व त्याचा एक सहकारी जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
0 Response to "मुंबईतील संगीत कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की; "
टिप्पणी पोस्ट करा