
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन
बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३
Comment
AURANGABAD - औरंगाबाद, कृषिमंत्री यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच सिल्लोड आंबेडकर चौक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन पुकारले असता यावेळी संपूर्ण तालुक्यातून ग्रामीण भागातील शेकडो शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलन दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या की सोयाबीन, मक्का, कापूस या पिकांना उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के भाव सरकारने जाहीर करावा. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिवसा आठ तास नियमितपणे वीज द्यावी. सप्टेंबर पासून नोव्हेंबर पर्यंत झालेले सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई द्यावी. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करावा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन देऊन चक्काजाम आंदोलन यशस्वीरित्या पार पडले. यावेळी दीड तासाहून अधिक वाहतूक ठप्प राहिल्याने रस्त्याच्या दोन्ही साईडने तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांची गर्दी झाली होती
0 Response to "स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन "
टिप्पणी पोस्ट करा