
दहावी बारावीच्या परीक्षा दरम्यान पालकांची भूमिका महत्त्वाची असते - डॉ. संदीप शिसोदे
बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३
Comment
AURANGABAD - दहावी बारावीच्या परीक्षा देत असताना मुलं तणावात असतात अशा परिस्थितीमध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र अनेक वेळा पालकांकडून चुका होतात आणि याचा परिणाम मुलांच्या परीक्षेवर होत असतो. यामुळे पालकांनी दहावी बारावीच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये काय काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात या संदर्भात मानसोपचार तज्ञ डॉ.संदीप सल्ला दिला आहे. शैक्षणिक जीवनामध्ये दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना महत्त्व आहे. दहावी बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा असतो. त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षेला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे. कोरोनाच्या दोन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतलं. या दरम्यान परीक्षा देखील ऑनलाईन झाल्या. यामुळे पारंपारिक प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची लिंक तुटली. मात्र , कोरोना संसर्गजन्य आजार दोन वर्षानंतर ओसरला आणि प्रत्यक्षात शाळा आणि परीक्षा घेण्यात येऊ लागल्या. आता परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी अभ्यास करून तयार आहेत. मात्र , परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेच्या दरम्यान अनेक पालकांकडून चुका होतात. या चुका विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर परिणाम करणाऱ्या असतात. पालकांनी या गोष्टी करण महत्त्वाच्या आहे, त्या म्हणजे मुल परीक्षेला जात असताना पालकांनी सूचना करणे टाळावं , मुलांच्या चांगल्या गुणांचं कौतुक यावेळी करावे , मुलांच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण होईल अशा गोष्टी कराव्यात , मुलांना परीक्षेच्या काळात चांगले मार्ग हे असं वारंवार म्हणू नये , मुलं परीक्षेवरून आल्यावर त्यांची प्रश्नपत्रिका घेऊन तू आणि चुका केल्या असं म्हणणं टाळावं , विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला परिषदाच भडीमार होईल असं वातावरण निर्माण करू नये , विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक वातावरण व त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत करावी. दहावी बारावीची परीक्षा म्हटल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी या परीक्षा गांभीर्याने घेत असतो आणि या परीक्षेचा वर्षभर अभ्यास करत असतो यामुळे परीक्षा चांगली जाईल यावरती विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास असतो अशा परिस्थितीमध्ये पालकांनी जबाबदारीने वागले पाहिजे त्यांच्याकडे सकारात्मक वातावरण निर्माण होईल असं वावर ठेवला पाहिजे कारण की पालकांची यावेळेसची भूमिका त्यांच्या परीक्षांवर परिणाम करणारे असते यामुळे या गोष्टी पालकांनी केल्या पाहिजे असं मानसोपचार तज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांनी सांगितले.
0 Response to "दहावी बारावीच्या परीक्षा दरम्यान पालकांची भूमिका महत्त्वाची असते - डॉ. संदीप शिसोदे"
टिप्पणी पोस्ट करा