
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेबद्दल चौकात उभे राहून जनजागृती
AURANGABAD - औरंगाबाद मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीच्या संवर्धनात चौका चौकात उभे राहून जतन करण्याची आव्हान करण्यात येत आहे हल्ली मराठी लिखाण्यात बोलण्यात पर्यायाने वाचण्यात व ऐकण्यात असे कितीतरी इंग्रजी शब्द आपण पाहतो ऐकतो परिणामी आपणही अधून मधून इंग्रजी शब्द बोलायला लागतो लिहायला लागतो. अशा पद्धतीने मराठी भाषा ही लुप्त होत चाललेली आहे शासनाच्या वतीने दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. पण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना असे लक्षात आले आहे की, आज आणि उद्या आपण का साजरा करतो तर सावरकरांनी त्या काळामध्ये इंग्रजी राज्य असताना आपल्या मराठी भाषेमध्ये विविध राज्यांमध्ये इंग्रजीची घुसखोरी कशी झाली होती. ती रोखण्यासाठी भाषा शुद्धी नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं. आपण मातृभाषेच्या प्रतिकाने वापर केला पाहिजे आणि पाळलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा पारशी भाषेचे आक्रमण झालेले आहे त्याकाळी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभाषा वापरण्यासाठी मराठी कोश तयार केला होता. आणि त्या अनुषंगाने आज सुद्धा मराठी भाषेची काय परिस्थिती आहे की प्रत्येक माणूस बोलता बोलता 50% शब्द इंग्रजी बोलतो कोणी एखादं काम केलं तर धन्यवाद ऐवजी थँक्यू म्हणतो, स्वारी म्हणतो, हॅप्पी न्यू इयर म्हणतो हे सगळे जे शब्द आहे मराठी शब्द आहे ते रास्त व्हायला कारणीभूत आहेत. मराठी भाषा शिकली पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे त्याकरता सर्व अभियान हे राबत आहे अशी जनजागृती कवी झटू करत आहेत.
0 Response to " मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेबद्दल चौकात उभे राहून जनजागृती"
टिप्पणी पोस्ट करा