
मुलभूत सुविधांचा वाळूज मध्ये अभाव, सिडको प्रशासनाविरोधात नागरिकाचे आमरण उपोषण
शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३
Comment
AURANGABAD - सिडको वाळूज महानगर -1 अंतर्गत LIG आणि MIG गृहनिर्माण योजनेतील जुनाट आणि निरुपयोगी झालेल्या ड्रेनेजलाइन्स तात्काळ बदलण्यात याव्यात व परिसरातील रहिवाशी नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात याकरिता सिडको प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही सिडको प्रशासनाला जाग येत नाही आहे. याचकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विभाग प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी सिडको कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मात्र, सिडको प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आमरण उपोषणकर्ते दत्तात्रय वर्पे यांच्या मागण्या सोडवण्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे सिडको प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर येत असल्याचे दत्तात्रय वर्पे सांगतात. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी झगडणाऱ्या नागरिकाचा बळी घेतल्यानंतरच गेंड्याची कातडी पांघरलेल्या सिडको प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल दत्तात्रय वर्पे यांनी केला आहे.
0 Response to "मुलभूत सुविधांचा वाळूज मध्ये अभाव, सिडको प्रशासनाविरोधात नागरिकाचे आमरण उपोषण "
टिप्पणी पोस्ट करा