-->
औरंगाबाद: जी २० शिखर सम्मलेनला फ़क्त २ दिवस बाकी, तय्यारी पूर्ण करण्यासाठी अधिकार्यांची धाव-धाव

औरंगाबाद: जी २० शिखर सम्मलेनला फ़क्त २ दिवस बाकी, तय्यारी पूर्ण करण्यासाठी अधिकार्यांची धाव-धाव

सौंदर्यकरण व सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

औरंगाबाद : जी 20 शिखर  परिषदेला आता फक्त दोन दिवस उरले आहे या अनुषंगाने औरंगाबाद महानगरपालिकेची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे शहरातील विविध ठिकाणी सौंदर्यकरण व सुशोभीकरणाचे काम अतिशय जलद गतीने  करण्यात येत आहे. आणि याचे परिणाम देखील सर्वसामान्यांना बघायला मिळत आहे बरेच नागरिकांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी जी20 निमित्त होत असलेले सौंदर्यकरण व सुशोभीकरणाचे कामाचे कौतुक केले आहे. यानिमित्त औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी हे देखील दिवसरात्र मेहनत घेऊन सदरील कामे गुणवत्तापूर्वक करून घेत आहेत.

आज दिनांक  २३ फेब्रुवारी रोजी  त्यांनी सकाळी ११ वाजेपासून दिल्ली गेट येथून सौंदर्यकरणाचे कामाची पाहणी केली आणि सखोल आढावा घेतला सदरील पाहणी दौरा  दिल्लीगेट पासून ते चिकलठाणा विमानतळापर्यंत पार पडला. सदरील दौऱ्यात  प्रशासक महोदयांनी प्रत्येक ठिकाणी थांबून होत असलेले कामांचा आढावा घेतला आणि सूचना केल्या याच्यात प्रामुख्याने रस्त्यांच्या दोन्ही बाजूने लावण्यात येणारे फ्लेक्स याच्यात अंशतः बदल ,हरित पट्टे, ठिक ठिकाणी झाडांचे कुंड्या ठेवणे  व इतर कामांचा समावेश होता. यावेळी उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, स्मार्ट सिटी चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील संबंधित वार्ड  अधिकारी आणि वार्ड अभियंता तसेच गुत्तेदारांची उपस्थिती होती.

0 Response to "औरंगाबाद: जी २० शिखर सम्मलेनला फ़क्त २ दिवस बाकी, तय्यारी पूर्ण करण्यासाठी अधिकार्यांची धाव-धाव "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe