
नवी मुंबई पोलिसांचा दणका,करोडोंच्या गुटख्यासह चार आरोपी जेरबंद
शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३
Comment
NAVI MUMBAI : नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ एकच्या तुर्भे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी एका संशयित टेम्पो मधून तब्बल 12 लाखांचा गुटखा जप्त केला होता,त्याच अनुषंगाने तपासात आणखी एका गुजरात मधून आलेल्या कंटेनरसह ताब्यात घेऊन तपासात कंटेनर मध्ये जवळपास 60 लाखांचा गुटखा असल्याचे दिसून आले,आतापर्यंत पोलिसांनी एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे,ते ही मोहीम अजून संपली नसून अजून काही धागेदोरे आमच्याकडे आहेत,त्यामुळे हा गुजरात मधून येणारा गुटखा नक्की कोण मागवतो आणि कुठे जातो याचा तपास सुरू असून,पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले,त्यामुळे मोठ्या कारवाईने गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
0 Response to " नवी मुंबई पोलिसांचा दणका,करोडोंच्या गुटख्यासह चार आरोपी जेरबंद"
टिप्पणी पोस्ट करा