-->
 वाळू माफियांच्या दहशतीने हादरला जालना जिल्हा ; अंबडच्या तहसीलदारावर केला हल्ला

वाळू माफियांच्या दहशतीने हादरला जालना जिल्हा ; अंबडच्या तहसीलदारावर केला हल्ला

  


JALNA - जालना जिल्ह्याच्या अंबड चे तहसीलदार विदयाचरण जगन्नाथ कडवकर हे अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या तहसील कार्यालयातील कक्षात शेतीच्या सुणावनीचे अर्धन्यायीक कामकाजाचे अनुषंगाने अँटी चेंबरमध्ये संबंधीत संचिका पाहत असतांना तहसिलदार कक्षासमोर असलेल्या शिपाई विकास डोळसे व जीवन म्हस्के यांनी पंकज सोळुंके रा.गोंदी यास थांबण्याचे सांगीतले असता तो न थाबंता तहसीलदार यांच्या अँटी चेंबरमध्ये आला व " तु माझा फोन का उचलत नाही,तु काल आमचे गोंदी व साष्ट पिंपळगाव येथील वाळु साठा का जप्त केला तसेच गोंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल का केला म्हणुन शिवीगाळ करु लागला. त्याचा अवतार पाहता तो हल्ला करेल असे वाटल्याने तहसीलदार कक्षात आले तिथेही तो त्यांच्या मागेच आल्याने  तहसीलदार कक्षाचे बाहेर पडले व कोरीडोर मध्ये आले. तिथून ते पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अंबड यांना फोन लावत असतानाच ,तु कोणाला फोन लावला, तु माझा फेरफार का मंजुर केला नाही असे म्हणुन दोन वेळा त्याने तहसीलदार यांच्या कानाखाली गालावर चापट मारल्या व खांदयावर ही मारले. हे घडत असताना कार्यालयीन शिपाई व ईतर लोकांनी त्याल पकडले. एका व्यक्तीने त्याला ओढत बाहेर काढले. तेव्हा त्याने मोठं मोठ्याने शिवीगाळ करत मी तुला पाहुन घेतो असे म्हणुन तहसीलदार यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व बाहेर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीत बसुन तो पसार झाला. तहसीलदार अंबड यांनी केलेल्या गोंदी व साष्ट पिंपळगाव येथील वाळु जप्तीच्या कारवाई, गोंदी पोलीस ठाणे येथे संभाजी खराद यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा व त्याचा फेरफार मंजुर न केल्याचा मनात राग धरुन पंकज सखाराम सोळुंके रा. गोंदी याने तहसीलदार कार्यालयात येवुन मला शिवीगाळ करुन, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या चापट बुक्याने मारहाण करुन आमच्या शासकीय अर्धेन्यायीक कामकाजास अडथळा निर्माण केला. सदर घटना तहसील कार्यालय अंबड च्या CCTV मध्ये रेकॉर्ड झाली असेल अश्या प्रकारची तक्रार तहसीलदार  विद्याचरण कडवकर यांनी  पोलिस स्टेशन मध्ये दाखल केली असून भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३५३,३३२,३२३,३५२,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटना स्थळावरील CCTV फुटेज ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.



0 Response to " वाळू माफियांच्या दहशतीने हादरला जालना जिल्हा ; अंबडच्या तहसीलदारावर केला हल्ला"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe