-->
फुलंब्रीत शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १३ जागेवर दणदणीत विजय

फुलंब्रीत शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १३ जागेवर दणदणीत विजय

लोकसवाल प्रतिनिधि/ शेख शाहरुख , फुलंब्री  येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर अँड. त्रिंबकराव शिरसाट व भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १३ जागेवर दणदणीत विजय मिळवित चाळीस वर्षांचे आपले अस्तित्व कायम ठेवले.

सोसायटीचे मतदान सोमवार (दि. १६) रोजी घेण्यात आले. २०१४ पैकी १८५५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी सात वाजता निकाल घोषित करण्यात आला. प्रतिस्पर्धी माजी जि. प. अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलला दारुण पराभव पत्करावा लागला. फुलंब्री, कान्होरी, डोंगरगाव कवाड, पिपळगाव गंगदेव, म्हसला, रेलगाव आणि पानवाडी मिळून फुलंबी सोसायटी तयार करण्यात आलेली आहे. एकूण २०१४ सभासद संख्या असलेल्या या सोसायटीत ४० वर्षांपासून अँड. त्रिंबकराव शिरसाठ यांची एकहाती सत्ता आहे शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार अॅड. त्रिंबकराव शिरसाठ, गिरजूबा काळे, उत्तम डकले, रघुनाथ ढंगारे, दामोदर म्हस्के, शामराव मालोदे, सलीम शेख,रेवनाथ सातपुते,चंद्रकलाबाई म्हस्के, इंदूबाई मिसाळ,दिलीप सावळे,अनिल जाधव, कडुबा वाघ विजयासाठी यांनी घेतले परिश्रम

नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, देवराव राऊत, योगेश मिसाळ, राम बनसोड, नगरसेवक गजानन नागरे, अजय शेरकर, एकनाथ ढोके, बाबासाहेब शिनगारे, रवींद्र कथार, अरविंद काथार, गणेश राऊत, पंडीत नागरे, राजेंद्र डकले, दामोदर पाथरे, विठोबा रघु सचिन डकले.आदी,

0 Response to "फुलंब्रीत शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १३ जागेवर दणदणीत विजय"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe