-->
माजी आ.राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अनुराधा फार्मसीच्या १५१ विद्यार्थ्यांचे रक्तदान

माजी आ.राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अनुराधा फार्मसीच्या १५१ विद्यार्थ्यांचे रक्तदान

लोकसवाल प्रतिनिधि / शेख शाहरुख,

उत्स्फूर्तपणे रक्तदान परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे सचिव मा.राहुलभाऊ बोंद्रे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून अनुराधा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना पथकद्वारे ०९ मे २०२२ सोमवार रोजी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. रक्तसंकलनासाठी बुलढाणा येथील जीवनधारा बुलढाणा अर्बन रक्तपेढी तसेच शासकीय रक्तपेढी बुलढाणा व त्यांचे चमू या रक्तपेढयांनी सहभाग घेतला. 

सदर शिबीरा मध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये तब्बल १५१ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी शेख आवेस सर  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी, प्राचार्य डॉ. आर. एच. काळे, प्राचार्य डॉ. आर. आर. पागोरे यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांचा उत्साह वाढविला शिबीर प्रसंगी प्रा. यु.एम. जोशी, प्रा. एस. एस. कुलकर्णी व डॉ. आशिष गवई हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. सुशीलकुमार शिंदे, प्रा. राहुल सरोदे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. सुरज सगरुळे, प्रा. सचिन गाडेकर, प्रा. सुजाता दुधे, प्रा. सोनाली मुंढे, प्रा. पलूवी गाडेकर, रा. से. यो. प्रतिनिधी वैभव ठेंग व तुळशीदास सोनुने यांनी सहकार्य केले. (ता.प्र.)

0 Response to "माजी आ.राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अनुराधा फार्मसीच्या १५१ विद्यार्थ्यांचे रक्तदान"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe