
तुकडेबंदी आदेश रद्द ; रजिस्ट्रीचा मार्ग मोकळा
औरंगाबाद : तुकडाबंदी शासन आदेशा संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी दि.०५ मे २०२२ रोजी मा. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादने शासनाने जारी केलेले १२ जुलै २०२१ रोजी जारी आदेश रद्द केले आहे. यामुळे शासनाला मोठा दणका बसला आहे. नोंदणी व महानिरिक्षक व मुंद्राक नियंत्रण पुणे यांनी १२ जुलै २०२१ रोजी परिपत्रक काढुन तुकडाबंदी कायद्याप्रमाणे सर्व जिल्हा निबंधक व दुय्यम निबंधक रजिस्ट्रार यांना सदरील तुकडेबंदी आदेशाची अमलबजावणी करा असे सक्तीचे आदेश दिले होते. त्यामुळे अनेक मिळकतीचे रजिस्ट्री न झाल्यामुळे प्लॉटींगच्या व्यवसायीकांना मोठा नुकसान होत होता. यावरुन शासनाच्या परिपत्रकाविरोधात काही व्यवसायीकांनी अॅड रामेश्वर तोतला यांच्या मार्पâत मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती.
गेल्या किमान ११ महिन्यांपासुन रजिस्ट्री म्हणजेच नोंदणीकृत खरेदीखत थांबविण्यात आले होते. आता रद्द झालेल्या आदेशा बाबत महानिरिक्षक कार्यालयाकडुन कायदेशीर स्पष्टीकरण येण्याची वाट बघितली जात आहे.
0 Response to " तुकडेबंदी आदेश रद्द ; रजिस्ट्रीचा मार्ग मोकळा"
टिप्पणी पोस्ट करा