
शहाजीराजेंचा आदर्श मानव जातीच्या कल्याणाचा - श्रीमंत मुधोजी राजे भोसले
४१ कोटीची प्रशासकीय मान्यता,स्वराज्य संकल्पक शहाजीराजे जयंती महोत्सव समिती च्या सांगता सोहळा थाटात संपन्न !
औरंगाबाद (प्रतिनिधी) नागपूरचे भोसले घराणे हिंदवी स्वराज्याचे विस्तारक आहे, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्मारका साठी आवश्यक ती सर्व मदत करण्या साठी नागपूरचे भोसले घराणे तत्पर आहे.
शहाजीराजेंचा आदर्श मानव जातीच्या कल्याणाचा असुन स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्मारकाच्या पाठी मागील बाजूस सुमारे १३६ एकरातील तलाव मालोजीराजे यांच्या कारकीर्दी तील आहे.तलावाचा समावेश स्मारक निर्मितीत करून शहाजीराजे यांचे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे या साठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही नागपूर संस्थानचे श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांनी रविवारी (दि.२०) रोजी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे जयंती महोत्सव समिती च्या सांगता सोहळा कार्यक्रमात दिली.
श्रीमंत मुधोजीराजे पुढे बोलतांना म्हणाले की, आजही वेरुळ परिसरात मालोजीराजे भोसले यांची छत्री, बाबाजीराजे यांची छत्री-गढी व अवशेष, परसोजी राजे यांची छत्री व इतर छत्र्या असुन तसेच १३६ एकर पेक्षा जास्त जागा असुन यातील डमडम तलाव असुन त्यांचे सन्मानाने जतन होणे गरजेचे आहे.प्रशासनाने स्मारकासाठी १ कोटी ४१लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहीती देतांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सी एस आर निधीतून सुद्धा पैसा उपलब्ध करून घेतला असुन शासनाकडे या प्रकल्पाच्या विकासा साठी विविध प्रस्ताव तात्काळ पाठविण्यात येतील आणि या प्रकल्पाला एक आगळा वेगळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प म्हणुन मान्यता मिळविण्यासाठी प्रखर मेहनत घेणार असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाची सुरुवात शाहीर सुरेश जाधव यांच्या पोवाड्याने आणि गोंधळाने झाली.
वेरूळ येथे आयोजित स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रसंगी भ्रमण ध्वनीवरून संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जयंती महोत्सव समितीचे संस्थापक किशोर चव्हाण,जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष इंजि. विजय घोगरे,कार्याध्यक्ष आणि जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, पानिपत येथील मराठा उत्थान समितीचे अध्यक्ष मराठा रामनारायण, प्रा.डॉ. आर.एम. दमगिर उपस्थित होते.
या महत्वपूर्ण कार्यक्रमाला विलास पांगारकर,राष्ट्रीय क्षेत्रीय जनसंसदेचे सभापती महेश पाटील बेनाडीकर, आंध्र प्रदेशचे सामाजीक समरसता संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णा किशोर,आशिष गायकवाड, वेरूळचे जि.प.सदस्य हिंदवी खंडागळे, वेरूळच्या सरपंच कुसुम मिसाळ, मराठा सेवा संघाचे तनपुरे,प्रा.गंगाधर बनबरे,मनोज आखरे, विंग कमांडर जाधव,तानाजी पाटील, प्रा.डॉ. रामकीसन पवार, विजय काकडे, धनंजय पाटील,राज पाटील,कल्पना चव्हाण,योगेश केवारे,रवींद्र काळे, विधिज्ञा सुवर्णा मोहिते,योगेश बहादूरे,विकिराजे पाटील,मनीषा मराठे,त्र्यबक पाटील, रेखा वहाटूळे, हेमा पाटील,सतीश वेताळ,जयाजी पवार,अशोक वाघ, अशोक वानखेडे, परमेश्वर नलावडे, अश्विनी रवींद्र पवार या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भ्रमणध्वनी वरुन बोलतांना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की,वेरूळ च्या ट्रॉमा केअर सेंटरच्या मागणी बाबतचा प्रस्ताव प्रशासनाने पाठवावा.त्यास मंजुरी देण्यात येईल आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या वेरुळ येथील स्मारकासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यावर अधिक भर राहील. तसेच वेरूळ येथील
ट्रॉमा केअर सेंटरच्या मागणी बाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर प्रशासनाने द्यावा तो त्वरित मंजुर करू असे टोपे यांनी नमुद केले व पुढे ते म्हणाले की, शासनाचे वेरुळच्या सर्वांगीण विकासा ला प्रथम प्राधान्य दिले असुन त्या नुसार सर्वांगीण विकास केला जाईल अशी ग्वाही राजेश टोपे यांनी यावेळी भ्रमणध्वनी वरून महोत्सव समितीस व उपस्थितांना दिली. वेरूळ येथे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सक्षम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वराज्य संकल्पक शहाजी राजे जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी करतांना अनेक बाबींचा सविस्तर उल्लेख करून नमुद केले की, मुळ भोसले कुटुंबियांच्या मालकी च्या जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली असुन अनेक समाधी छत्री नष्ट करण्याचा डाव असुन काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असुन त्यात सक्षम पणे बाजु मांडण्याची गरज असुन गढी च्या मागे १३७ एकर जागा असुन या ठिकाणी सिंचनाचे पाणी अडवल्या गेले असुन त्याचे स्रोत बुजवल्या गेली आहेत तर वैद्यकीय उपचारा साठी ट्रॉमा सेंटर, गढी चा सर्वंकष विकास अशा अनेक बाबीवर त्यांनी प्रकाश टाकला.
या प्रसंगी बोलतांना महोत्सव समितीचे अध्यक्ष इंजि.विजय घोगरे म्हणाले की, माझे विभागाच्या वतीने तलावातील बुजलेले पाण्याचे स्रोत मोकळे करण्यात येतील आणि सिंचनाची जी काही निकड असेल ती पुर्ण करण्यात येईल असेही पुढे ते म्हणाले.
या वेळी अनेक तज्ञ,जलभ्यासक, सामाजीक कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यात पानीपत येथील मराठा रामनारायण, राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदेचे सभापती महेश पाटील बैनाडीकर,आंध्रप्रदेशचे सामाजिक समरसता संघटनाचे सरचिटणीस कृष्णा किशोर,छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विलास पांगारकर आ.प्रशांत बंब,यशवंत पाटील मिसाळ यांना तर विशेष बाब म्हणुन मरणोत्तर गौरव पुरस्कार स्व.प्रा.देविदास वडजे आणि स्व. मिलींद पाटील यांना देण्यात आले असुन त्याचा स्वीकार त्यांच्या कुटुंबीयांनी केला.
स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांचे एकंदरीत कार्यावर प्रकाश झोत टाकणारे व्याख्यान प्रा.गंगाधर बनबरे यांनी देऊन अनेक महत्वपुर्ण बाबी उजेडात आणल्या.
या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विविध दाखले देत आणि उत्कृष्टपणे क्रमवारी करीत स्वराज्य संकल्पक शहाजी राजे जयंती महोत्सव समिती चे कार्याध्यक्ष जेष्ठ जलभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी केले व पालकमंत्री सुभाष देसाई यांचे महत्वपुर्ण योगदान व महत्वाचे सहकार्य असल्याचे विशेष करून नमुद केले तर उपस्थितांचे आभार खुमासदारपणे सरचिटणीस डॉ.प्रा.आर एम दमगिरे यांनी व्यक्त करतानां अग्निशमन दल, पुरातत्व विभाग, ग्रामीण खुलताबाद पोलीस स्टेशन,राखीव दलाचे वाद्य पथक,जिल्हा प्रशासन,वेरुळ ग्रामपंचायत,ग्रामस्थ यांचे विशेष आभार व्यक्त केले तर पहाडी आवाजात गारद देऊन श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांना मानाचा मुजरा अश्विनी रवींद्र पवार यांनी दिला त्यानंतर सामुहीक राष्ट्रगाण घेण्यात येऊन कार्यक्रम संपल्याचे समितीच्या वतिने जाहीर करण्यात आले.
0 Response to "शहाजीराजेंचा आदर्श मानव जातीच्या कल्याणाचा - श्रीमंत मुधोजी राजे भोसले"
टिप्पणी पोस्ट करा